कोकणात आलेल्या पुरातील लोकांना आपुलकी कडून मदत
आपल्या सर्वांना माहित आहेच कि, गेल्या वर्षी पावसाच्या पुराने कोकणातील चिपळूण मधील दलवटणे या गावाची संपूर्ण वाताहात झाली होती. या गावचा इतर गावांची संपर्क तुटला होता. होत्याचे नव्हते झाले होते. उपासमारी व बेरोजगारीचा कळस गाठला होता. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अशा परिस्थितीत आपुलकीने या गावाला मदतीचा हात दिला. गावकऱ्यांना कपडे, किराणा, व रोख रक्कम अशी मदत पुरवली. एक कुटुंब शिंपी काम करून पोट भरत होते. त्यांची शिलाई मशीन पुरात वाहून गेली. त्यांना मशीन घेऊन दिली. एकाची रिक्षा वाहून गेली त्याला ती दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदत दिली. जेमतेम पन्नास उंबरठे असलेले गाव. त्या गावाला या धक्क्यातून सावरण्यासाठी आपुलकीने मदत केली.