(बालकाश्रम, बालसदन, बालगृह, सुधारगृह माजी
विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रणित संघटना)
Menu
बदल शक्य आहे.गरज तुमच्या "आपुलकी" ची.
आपुलकी
“जो जे वांच्छिल तो ते लाहो”
आत्मीय,
सस्नेह नमस्कार………आपले महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण भारत देशात सर्वार्थाने प्रगतीशील, समतावादी तसेच मानवतावादी राज्य आहे. ही संतांची भूमी असल्याने तिला करुणेची आणि मानवतेची फार मोठी परंपरा आहे. संकट काळात दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे हा तर येथील माणसांचा स्थायीभाव आहे.
मित्रहो, आपल्या समाजात असाही एक दुर्दैवी समाज आहे ज्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही, तो समाज तो वर्ग म्हणजे वंचित-निराधार मुले कौटुंबिक-सामाजिक आपत्तीमुळे ही हजारो मुले-मुली रस्त्यावर येतात. अशा मुलांसाठी शासनातर्फे महिला व बाल विकास विभाग आणि काही स्वयंसेवी संस्थांमार्फत त्यांचे पुनर्वसन केले जाते. (संगोपन, शिक्षण इ.) त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. “आपुलकी” ही अशीच एक स्वयंसेवी संस्था आहे. जी वंचित-निराधार, मुलांचे पुनर्वसन करीत आहे. इ.स. १९९५ पासून श्री.मनोज दांडेकर आणि राजेंद्र बेलवलकर या दोन तरुणांनी “आपुलकी” ची स्थापना करुन महाराष्ट्रभर तिची व्याप्ती वाढवली. इ.स. २०१६ मध्ये या संस्थेची अधिकृत नोंदणी होऊन, शासकीय नियमानुसार कार्यकारी मंडळ, सदस्य नेमण्यात आले. विशेष म्हणजे या संस्थेचे वैशिष्ट्य हे की, सर्व सदस्य पदाधिकारी एकेकाळी वंचित-निराधार होते. समाजात त्यांनी प्रमाणिकपणे, स्वकष्टाने स्वतःचे स्थान निर्माण केलेले असून सन्मानाने जीवन जगत आहेत.
आपुलकीच्या या सर्व सभासदांचे स्वानुभव पुढील पिढीला सोसावे लागू नयेत म्हणून कृतज्ञतेपोटी ह्या वंचितांना स्वबळावर उभे राहता यावे म्हणून अखंडपणे मदतीचा स्त्रोत पुरवत आहेत. आपला समाज संवेदनशील व सहवेदना जाणणारा असून अत्यंत दातृत्वशील आहे. आपल्या सर्वांच्या निरलस प्रेमामुळे आणि आर्थिक सहाय्यामुळेच ही मुले समाजात तग धरु शकणार आहेत. आजपर्यंत अनेक मुला-मुलींचे आपुलकीने पुनर्वसन केलेले आहे. या पुढे आपल्या आपुलकी आणि प्रेमामुळेच त्यांना जीवन संजीवनी मिळणार आहे.
आपल्या सर्वांना माहित आहेच कि, गेल्या वर्षी पावसाच्या पुराने कोकणातील चिपळूण मधील दलवटणे या गावाची संपूर्ण वाताहात झाली होती. या गावचा इतर गावांची संपर्क तुटला होता. होत्याचे नव्हते झाले होते.